भाजपने हुकूमशाहीला फुलस्टॉप दिला; तावडेंचा विरोधकांवर निशाना
विनोद तावडे यांनी यावेळी भाजपचे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हे फक्त त्यांच्या पक्षाच्या घराणेशाही, सांप्रदायिकतेच्या जोरावरच भाजपला विरोधक करतात. तर भाजपने या देशातल्या घराणेशाहीच्या राजकारणाला फुलस्टॉप दिला आहे
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या 43 व्या स्थापना दिनानिमित्त सध्या राज्यभरात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. नागपूरात देखील अशा एका कार्यक्रमाला विनोद तावडे यांनी हजेरी लावली. तसेच तावडे यांनी यावेळी भाजपचे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हे फक्त त्यांच्या पक्षाच्या घराणेशाही, सांप्रदायिकतेच्या जोरावरच भाजपला विरोधक करतात. तर भाजपने या देशातल्या घराणेशाहीच्या राजकारणाला फुलस्टॉप दिला आहे. घराणेशाहीकडून येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिलाय असेही ते म्हणाले. तर भाजप हे सत्तेसाठी नाही, तर समाज परिवर्तनासाठीचे साधन आहे. हे साध्य नाहीये आणि हे समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजप तत्परतेने काम करत असल्याचेही तावडे म्हणाले. तर गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्रातल्या सरकारवर कुठलेही आरोप नाहीत. भ्रष्टाचार विहिरीत सत्ता ही देता येते हे भाजपने सिद्ध केल्याचे ते म्हणाले.