J. P. Nadda on Uddhav Thackeray | भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

J. P. Nadda on Uddhav Thackeray | भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

| Updated on: Jan 02, 2023 | 4:49 PM

मविआने दलाली आणि कमिशन खोरी केली. तर मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला असेही नड्डा म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करण्यासह अवघड 18 मतदारसंघ ही निवडले आहेत. यावेळी नड्डा यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी नड्डा यांनी, महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मविआने भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. उद्धव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. जेथे जावा तेथे माथा टेकावं लागणार. त्यामुळेच माथाच नाही राहिला.

तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, नड्डा म्हणाले, हिंदूहृदयसम्राटाच्या मुलाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हात मिळवणी केली. त्यांनी विरोधक असणाऱ्यांसोबतच जात सत्ता स्थापन केली. तर मविआने दलाली आणि कमिशन खोरी केल्याचीही टीका नड्डा यांनी केली. तर मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला असेही नड्डा म्हणाले.

Published on: Jan 02, 2023 04:49 PM