धक्कादायक! नड्डा यांच्या तोतया स्वीय सहायकाचा कारणामा? भाजपच्या आणखी एका आमदाराला दिली ऑफर; पण असा प्लॅन फसला
याचदरम्यान आता आणखी एक भाजप आमदार पुढे आला असून त्याने आपल्याला देखील त्या तोतया स्वीय सहायकाचा फोन आल्याचं म्हटलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक आहे, असे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी किमान सहा आमदारांकडे मोठ्या रक्कमेची मागणी झाल्याचे उघड झाले आहे. यात राज्यातील चार आमदारांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अनेक गोष्टी आता उघड होत आहेत. पोलिसांनी निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून अटक केली. याचदरम्यान आता आणखी एक भाजप आमदार पुढे आला असून त्याने आपल्याला देखील त्या तोतया स्वीय सहायकाचा फोन आल्याचं म्हटलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पूर्व नागपुरचे भाजप आ. कृष्णा खोपडे यांनी याबाबत दावा करताना आपल्याला फोन आल्याचे म्हटलं आहे. तसेच पैशांच्या बदल्यात मंत्रीपदाच्या ऑफरसाठी देण्यात आल्याचे ते म्हणाले. तर हा फोन त्यांना काही महिन्यांपूर्वी आला होता. तर यासंदर्भात आपल्याला पाच फोन आले होते असंही त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांना दिल्लीतून शर्मा नावाच्या व्यक्तीने फोन केल्याची माहिती खोपडे यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्याला ही ऑफर नड्डा याचं नाव सांगून देण्यात आल्याचंही ते म्हणाले. मात्र वेळीच आपल्या लक्षात आल्याने फसवणुकीचा हा प्रयत्न फसल्याचं ते म्हणाले.