‘शिंदे यांना आयत्या पिठावर रेघोट्या मारायला का बसवलं?’ ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा अमित शाह यांना सवाल
यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल 2019 च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, हे उद्धव ठाकरे यांनी स्वत: मान्य केलं होतं, असा खुलासा यांनी केला.
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या नांदेड दौऱ्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल 2019 च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, हे उद्धव ठाकरे यांनी स्वत: मान्य केलं होतं, असा खुलासा यांनी केला. त्यावरून आता राजकारण चांगलचं तापलेलं आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांनाच प्रतिसवाल केला आहे. त्यांनी जर फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायची इच्छा होती. तर फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे भाजपाने कसे काय मान्य केले. अमित शहा यांनी यावर बोलायला हवं. यावरून हेच सिद्ध होतं की मुख्यमंत्री कोण याहीपेक्षा शिवसेना संपवणे हाच शहा यांचा उद्देश होता. तर शिंदे यांना आयत्या पिठावर रेघोट्या मारायला का बसवलं? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.