…म्हणून विरोधकांची सुरक्षा काढली; भास्कर जाधव यांचा पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल
राज्य सरकारकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
मुंबई : राज्य सरकारकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल कोला आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा व्यवसायिकाची सुरक्षा काढताना आधी पोलिसांकडून आढावा घेतला जातो, तसा आढावा घेण्यात आला का असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच जर आढावा घेतल तर तो फक्त विरोधकांचाच घेतला का? हा सर्व देखावा आहे. विरोधकांची सुरक्षा कमी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करायची, जेणेकरून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तसेच त्यांच्या अपयशी कारभाराबाबत बोलूच शकणार नाहीत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 30, 2022 01:57 PM
Latest Videos