Bhaskar Jadhav : माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव चिडले
Assembly Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून सभागृहात विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी माझ्या नावाला विरोध असेल तर पत्र मागे घेतो, असं उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. सचिवालयाकडे पत्र दिलं आहे. 10 टक्क्यांची अट कुठेही नाही, असंही यावेळी जाधव यांनी म्हंटलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. हवं तर महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं तरी पत्र देतो, असंही भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. विरोधी पक्ष नेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं. सरकारकडे बहुमत असून ते घाबरत आहे का? विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. आम्ही आमचं काम केलं आहे. माझ्या नावाची अडचण असेल तर मी माझं पत्र आत्ता मागे घेतो आणि महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कोणाच्या नावाचं पत्र देतो, असं म्हणत भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर टीका केली.

धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा

धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..

'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
