चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली खिल्ली; ठाकरे गटाने दिलं असं उत्तर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली खिल्ली; ठाकरे गटाने दिलं असं उत्तर

| Updated on: Jul 27, 2023 | 8:52 AM

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असं बावनकुळे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी टीका केली आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल आणि आज प्रखर मुलाखत प्रसारीत झाली. उद्धव ठाकरे यांची मुलाखत पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. कालच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असं बावनकुळे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 27, 2023 08:52 AM