मनसेच्या खरमरीत प्रत्युत्तरावर भाजप नेत्याचा पलटवार; ‘कायदा सर्वांसाठी..., जे कायदा हातात घेतील...'’

मनसेच्या खरमरीत प्रत्युत्तरावर भाजप नेत्याचा पलटवार; ‘कायदा सर्वांसाठी…, जे कायदा हातात घेतील…’’

| Updated on: Jul 25, 2023 | 3:10 PM

अमित ठाकरे यांच्या अपमानावर समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली होती. अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही.

मुंबई, 25 जुलै 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावरून सध्या जोरदार राजकारण तापलेलं आहे. अमित ठाकरे यांच्या अपमानावर समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली होती. अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा असा टोला भाजपकडून ट्विट करत लगावण्यात आला होता. त्यावरून मनसेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजप महाराष्ट्रातील मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का? असा सवाल केला आहे. तर यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. ट्विटरवर सुरू झालेला वाद आता शाब्दीक वॉरपर्यंत आला आहे. यावेळी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांना मनसेच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भातखळकर यांनी, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याचा धर्म, जात, प्रांत, भाषा, वेश याच्या पलिकडं जाऊन कायद्याचं राज्य आणण्याचं काम आमचं सरकार करेलं. तर जे कायदा हातात घेतील त्यांच्यासाठी कायदा हाच असल्याचा इशाराच यावेळी भातखळकर यांनी मनसेला दिला आहे.

Published on: Jul 25, 2023 03:10 PM