विसर्जन मिरवणुकीत भावना गवळींनी धरला ठेका

विसर्जन मिरवणुकीत भावना गवळींनी धरला ठेका

| Updated on: Sep 09, 2022 | 1:46 PM

कोरोनाच्या संकटानंतर सलग दोन वर्षांनी गणेश विसर्जनाची मिरवणूक होत असल्याने राज्याभर मोठ्या उत्साहात मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते, अभिनेत्यांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवत ढोल ताशाच्या गजरात चाललेल्या मिरवणुकीत अनेकांनी ठेका धरला आहे.

कोरोनाच्या संकटानंतर सलग दोन वर्षांनी गणेश विसर्जनाची मिरवणूक होत असल्याने राज्याभर मोठ्या उत्साहात मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते, अभिनेत्यांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवत ढोल ताशाच्या गजरात चाललेल्या मिरवणुकीत अनेकांनी ठेका धरला आहे. यामध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळींनीही मिरवणुकीत ठेका धरला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेे की, यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव झाला असला तरी विसर्जन मिरवणुकही शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता काढा असे आवाहन त्यांनी गणेश भक्ताना आणि मंडळाना केले आहे. निर्बंध मुक्त मिरवणुका निघत असताना नागरिकांनीही मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी होण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. खासदार भावना गवळी यांनी शांततेचे आवाहन करत गणेश भक्तांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Published on: Sep 09, 2022 01:44 PM