भिमा कोरेगाव प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला त्रास
भिमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे आणि माझं नाव जाणीवपूर्वक गोवलं गेले असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. याप्रकरणी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्हाला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून, भिमा कोरेगाव प्रकरणात जाणीवपूर्वक त्रास दिला गेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या संघटनेला मानसिक […]
भिमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे आणि माझं नाव जाणीवपूर्वक गोवलं गेले असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. याप्रकरणी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्हाला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून, भिमा कोरेगाव प्रकरणात जाणीवपूर्वक त्रास दिला गेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या संघटनेला मानसिक त्रास देण्यात आला आहे. त्यामुळे हिंदुत्वाची बदनामीही झाली आहे. त्यामुळे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार आहे असे मतही त्यांनी मांडले.
Published on: May 05, 2022 10:34 PM
Latest Videos