Pune crime : भिकारी बनून आल्या, २०० तोळे दागिने घेऊन पसार झाल्या
महिलांनी घरातील 1 कोटी रुपयांचे 200 तोळे सोन्याचे दागिने, परदेशी चलन, मौल्यवान घड्याळ आणि इतर वस्तूंची चोरी केली.
पुणे : पुण्यातील ( PUNE ) उच्चभ्रू अशा पाषाण ( PASHAN ) भागातील सिंध सोसायटीत ( SINDH SOCIETY ) चोरीची घटना घडली. भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या तीन महिलांनी तब्ब्ल २०० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. फिल्मी स्टाईल घडलेल्या या घटनेचा तपास करून चोरांना अटक करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.
सिंध सोसायटीत समीर दयाल यांचा बंगला आहे. भिकारी बनून आलेल्या त्या महिलांनी भीक मागण्याच्या निमित्ताने अनेक दिवस बंगल्याची रेकी केली. भिकारी असल्यामुळे दयाल याना त्यांची द्या येऊ लागली. त्यामुळे ते त्या महिलांना जेवण देत असत. हळूहळू त्यांचा परिचय वाढला. याचा फायदा घेत त्या महिलांनी बंगल्यातील सर्व माहिती घेतली.
11 डिसेंबरला काही कार्यक्रमानिमित्त दयाल कुटुंबीय बाहेर गेले. ही संधी साधून त्या महिलांनी घरातील 1 कोटी रुपयांचे 200 तोळे सोन्याचे दागिने, परदेशी चलन, मौल्यवान घड्याळ आणि इतर वस्तूंची चोरी केली. चतुर्श्रुंगी पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करत दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.