‘Tv9 मराठी’ नं मुंबई-गोवा महामार्गावरील भल्या मोठ्या खड्ड्यांची काढली मापं !

| Updated on: Aug 16, 2023 | 7:57 PM

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनं चालवताना वाहन चालकांची मोठी कसरत, प्रवासी वैतागले...'Tv9 मराठी' नं भल्या मोठ्या खड्ड्यांची काढली मापं! बघा काय आहे Mumbai-Goa Highway सध्यस्थिती?

रायगड, १६ ऑगस्ट २०२३ | जीव मुठीत घेऊन प्रवास करावा असा मुंबई-गोवा महामार्गावरून गेल्या अनेक वर्षांपासून चाकरमानी, सामान्य नागरिक प्रवास करत आहेत. हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनत आहे. कारण या महामार्गावर हजारोंच्या संख्येने खड्डे असल्यामुळे कित्येक नागरिकांचे जीव या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत. गेल्या 14 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. हजारोंच्या संख्येने या रस्त्यावरती खड्डे असल्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पेन शहरातील माझं पेन या संघटनेकडून गेल्या वर्षभरामध्ये मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर तयार करण्यात यावा आणि त्याचसोबत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात यावे याकरता वारंवार आंदोलन करण्यात आलेली आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग संस्थेकडून या संस्थेला फक्त आश्वासन दिली गेलेली असल्यामुळे हे सर्व पेन कर सरकारच्या या धोरणांना त्रस्त झालेले आहेत.आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुंबई गोवा महामार्गावरून मनसेची भूमिका मांडलेली आहे. दरम्यान, या महामार्गाच्या संदर्भात आतापर्यंत अनेक आंदोलन, बैठका आणि सभा झालेल्या आहेत परंतु या महामार्गाची अवस्था जैसे थे तशीच आहे. त्यामुळे आता या महामार्गाच्या प्रश्नांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 16, 2023 07:57 PM
राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं घडतंय तरी काय? शरद पवार गट निवडणूक आयोगात उत्तर सादर करणार नाही?
भूमिपूजन फलकावरून वाद शिगेला, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना कुठे भिडले?