अभिजीत बिचुकले यांनी काल कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला; आज धमकीचा फोन! पाहा…
अभिजीत बिचुकले यांनी कसबा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर त्यांना ही धमकी आली आहे. पाहा...
बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अभिजीत यांनी कसबा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर त्यांना ही धमकी आली आहे. अभिजीत बिचुकले यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा… अशा धमक्या येत असल्याचा आरोप बिचुकले यांनी केलाय. अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
Published on: Feb 08, 2023 10:58 AM
Latest Videos