Video: बहुमत चाचणीआधी बिहारमध्ये ईडीचं धाडसत्र

Video: बहुमत चाचणीआधी बिहारमध्ये ईडीचं धाडसत्र

| Updated on: Aug 24, 2022 | 10:45 AM

नुकतंच बिहारमध्य सत्तांतर झालंय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय. अश्या सगळ्या परिस्थितीत सीबीआयकडून पहिली छापेमारी करण्यात आली आहे. आरजेडी नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे नितीश तेजस्वी यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी आहे. मात्र त्याआधीच ही कारवाई करण्यात आली आहे. नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप […]

नुकतंच बिहारमध्य सत्तांतर झालंय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय. अश्या सगळ्या परिस्थितीत सीबीआयकडून पहिली छापेमारी करण्यात आली आहे. आरजेडी नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे नितीश तेजस्वी यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी आहे. मात्र त्याआधीच ही कारवाई करण्यात आली आहे. नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नोकरभरती घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने लालू यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Published on: Aug 24, 2022 10:45 AM