Bihar Political Crisis : बिहारमधील जेडीयू-आरजेडी सरकारचा दुपारी 2 वाजता शपथविधी, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
बिहारमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. राजभवन येथे दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याकडे लक्ष लागून आहे.
नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar) नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीशकुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्ष (BJP) नसून राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत असणार आहे. राजभवन येथे दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान, 2017 मध्ये नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी असल्याचे सांगून आरजेडीतून सुटका करून घेतली होती . आतापर्यंत या प्रकरणांमध्ये तेजस्वी यादव यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. परंतु नितीश त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे. आता बिहारमधील हे नवं सरकार कसं काम करतं. याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. कारण, नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत घरोबा केला. हा देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.