झाडांवर जाहिरात लावताय? मोळं मारताय! तर मग ही बातमी तुमच्यासाठी; आता असं कराल तर होणार गुन्हा दाखल
काही संस्थांकडून अनेकदा झाडांवर खिळे ठोकून, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जात आहे. यामुळे झाडांचे विद्रुपीकरण होतेच, पण त्या झाडांचे प्राण ही गेले आहेत.
नाशिक : राज्याच्या अनेक ठिकाणी तुम्हाला जाहिरातीचे फलक हे झाडांना मारलेले दिसतील. ते जाहिरातीचे फलक मोळे मारून अथना इतर कशाने तरी बांधून झाडांवर लावले जातात. अशामुळे तेथील निसर्गिक सौदर्यं संपले आहे. तर विद्रुपीकरण होताना दिसत आहे. असेच काहीसे चित्र नाशिकमध्ये पहायला मिळत आहे. येथे काही संस्थांकडून अनेकदा झाडांवर खिळे ठोकून, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जात आहे. यामुळे झाडांचे विद्रुपीकरण होतेच, पण त्या झाडांचे प्राण ही गेले आहेत. अशा जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आलीय. जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय. त्यामुळे आता नाशिकमध्ये तरी हा प्रकार थांबणार का हे पहावं लागणार आहे.