पाऊस लांबलाय? पेरण्याही खोळंबल्या, मात्र यांच्या शेतात कापशी उगवली ही; काय केलं पहा....

पाऊस लांबलाय? पेरण्याही खोळंबल्या, मात्र यांच्या शेतात कापशी उगवली ही; काय केलं पहा….

| Updated on: Jun 14, 2023 | 4:29 PM

घाटाखालील शेतकऱ्यांनी खामगाव, शेगांव, संग्रामपूर, जळगाव जामोद सह इतर ठिकाणी कपाशी लागवडीला सुरुवात केलीय असून अनेकांनी शेतात कपाशीची लागवड केलीय. तर कोरडवाहू शेतकरी कपाशी लागवडी साठी अद्यापही पावसाची वाट पाहत आकाशाकडे नजरा ठेऊन आहेत.

बुलढाणा : सध्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सून पुढे ढकलला आहे. मात्र यामुळे तळ कोकणासह काही जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अजूनही पाऊस नाही. त्यामुळे येथे पिण्याच्या पाणीसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातही अनेक भागात पेरण्या थांबल्या आहेत. मात्र येथील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांची जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र मात्र जून महिला अर्धा झाला तरी पाऊस आलेला नाहीय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षात आहे. तर घाटाखालील शेतकऱ्यांनी खामगाव, शेगांव, संग्रामपूर, जळगाव जामोद सह इतर ठिकाणी कपाशी लागवडीला सुरुवात केलीय असून अनेकांनी शेतात कपाशीची लागवड केलीय.

तर कोरडवाहू शेतकरी कपाशी लागवडी साठी अद्यापही पावसाची वाट पाहत आकाशाकडे नजरा ठेऊन आहेत. ज्यांच्याकडे विहिरीचे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन वर बागायती कपाशीची लागवड केलीय असल्याने कपाशी शेतात डोलू लागलीय. जून महिन्यात कपाशी लागवड केल्याने रोगराई कमी पडते, तर उत्पन्न सुद्धा जास्त होते, अशी धारणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

Published on: Jun 14, 2023 04:29 PM