Jalgaon : जळगावातल्या पाचोऱ्यात शिंदे गटाचा भाजपाला दे-धक्का, भाजपातून कार्यकर्ते फुटले
शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा हरतऱ्हेचे प्रयत्न करताना आता अंतर्गत कलहामुळे पाचोऱ्यातील भाजपात मात्र फूट पडली असून त्यांनी थेट शिंदे गटातच प्रवेश केला आहे.
पाचोरा, जळगाव : भडगाव (Bhadgaon) विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर अप्पा पाटील (Kishor Appa Patil) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. भडगाव येथील भाजपाचे पदाधिकारी आणि माझे गाव माझे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र ततार तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी नितीन महाजन यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपाच्या युतीचे सरकार असताना भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा हरतऱ्हेचे प्रयत्न करताना आता अंतर्गत कलहामुळे पाचोऱ्यातील भाजपात मात्र फूट पडली असून त्यांनी थेट शिंदे गटातच प्रवेश केला आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
