Kishori Pednekar | गोवंडीतील रस्त्याला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यास भाजपचा पाठिंबा, शिवसेनेचा पलटवार

| Updated on: Jul 17, 2021 | 9:21 AM

प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.

Kishori Pednekar | गोवंडीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्यास भाजपचा पाठिंबा, शिवसेनेचा पलटवार
kishori pednekar (1)
Follow us on

गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे. राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. गोवंडी, कचराभूमी येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता.