Special Report | याकूबच्या कबरीवरुन, भाजप विरुद्ध शिवसेना
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कबरीचं सुशोभिकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपचा आहे. तर फाशी दिल्यानंतर दशतवादी याकूबचा मृतदेह केंद्र सरकारनं कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला ?, असा पलटवार शिवसेना आणि काँग्रेसनं केलाय.
मुंबई : दहशतवादी याकूब मेमनला फाशी देऊन 7 वर्षे झाली आणि आता त्याच्या थडग्याच्या सुशोभिकरणावरुन, भाजप-शिवसेना आमनेसामने आलीय. या कबरीला संगमरवरी फरश्या आणि लायटिंगनं सुशोभित करण्यात आलंय. LED लाईट्सनं याकूबच्या कबरीवर लख्ख प्रकाश दिसतोय. ही बाब आता समोर येताच, राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भडका उडाला.
मुंबईतल्या बडा कब्रस्तानमध्ये याकूबची कबर आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कबरीचं सुशोभिकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपचा आहे. तर फाशी दिल्यानंतर दशतवादी याकूबचा मृतदेह केंद्र सरकारनं कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला ?, असा पलटवार शिवसेना आणि काँग्रेसनं केलाय.
Published on: Sep 08, 2022 10:11 PM
Latest Videos