Sena Vs BJP | Borivali उड्डानपुलाच्या लोकार्पणावरुन आमनेसामने-tv9
हा उड्डाणपूल तयार व्हावा यासाठी भाजपने पाठपुरावा केला आणि त्याचं लोकार्पण आता शिवसेना करत आहे. हे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
मुंबई : बोरीवलीत भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते आमनेसामने येण्याचे प्रकार हे होतच असतात. यातून दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी आणि आक्रमकपणा पहायला मिळतो. आजही असाच आक्रमकपणा आणि घोषणाबाजी मुंबईकरांना पहायला मिळाली. बोरीवली उड्डानपुलाच्या लोकार्पणावरुन सोहळ्यावरून हा गदारोळ पहायला मिळत होता. आज येथील कोरा केंद्र उड्डाणपुलाचं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. याच गोष्टीवर भापने आक्षेप घेतला होता. तर हा उड्डाणपूल तयार व्हावा यासाठी भाजपने पाठपुरावा केला आणि त्याचं लोकार्पण आता शिवसेना करत आहे. हे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर कार्यक्रमात भाजपकडून खोडा घातला जात असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. यातूनच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.