‘हे मान्य नाही’, शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप

| Updated on: Sep 13, 2024 | 11:14 AM

यामिनी जाधव या भायखळा येथील शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या दक्षिण मुंबईतून पराभव झाला. यामध्ये मुस्लिम मतांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. यामुळे बुरखा वाटपाचा कार्यक्रम शिंदेंच्या शिवसेनेने हाती घेतलाय का? अशी टीका विरोधकांकडून होतेय.

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील भायखळामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलं. यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भायखळातून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने बुरखा वाटपावर भाजप सहमत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. “आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही”, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट