धाकधूक अजिबातच नाही!; मतमोजणीला सुरूवात, अश्विनी जगताप यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त

धाकधूक अजिबातच नाही!; मतमोजणीला सुरूवात, अश्विनी जगताप यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त

| Updated on: Mar 02, 2023 | 9:28 AM

Chinchwad Assembly Election Result 2023 : पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. शंकर गावडे कामगार भवनात ही मतमोजणी होत आहे. पाहा व्हीडिओ...

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.यात तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. या मतमोजणी दरम्यान अश्विनी जगताप यांनी tv9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. “पोस्टल मतदानात मी आघाडीवर आहे. ही लक्ष्मण जगतापसाहेब यांनी केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. मनात कोणतीही धाकधूक वाटत नाही. तर आमचाच विजय निश्चित आहे, असं अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करणार, असा शब्द मी जनतेला देते, असंही त्या म्हणाल्या.

Published on: Mar 02, 2023 09:18 AM