भाजपने घेतला महाविकास आघाडीचा धसका, निवडणुकीसाठी सात तास मॅरेथॉन बैठक

भाजपने घेतला महाविकास आघाडीचा धसका, निवडणुकीसाठी सात तास मॅरेथॉन बैठक

| Updated on: Feb 16, 2023 | 9:04 AM

कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजप प्रयत्न फसला. कॉंग्रेसने कसबा येथे तर राष्ट्रवादीने चिचंवड येथे उमेदवार देऊन भाजपची कोंडी केली आहे.

पुणे : कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजप प्रयत्न फसला. कॉंग्रेसने कसबा येथे तर राष्ट्रवादीने चिचंवड येथे उमेदवार देऊन भाजपची कोंडी केली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थिती ही निवडणूक जिंकायचीच असा निर्धार भाजपने केला आहे. यासाठी खास रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एक बैठक घेण्यात आली. सतत सात तास अशी ही मॅरेथॉन बैठक घेण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या घरी घेण्यात आलेल्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी उपस्थित होते.