कुणाला काय करावे हे सांगायला लागत नाही, अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

कुणाला काय करावे हे सांगायला लागत नाही, अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 05, 2023 | 4:20 PM

मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. आमच्या घरातील सगळी माणसे कामाला लागली आहेत. उद्या मी अर्ज दाखल करणार आहे.

पुणे : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यावरून कटुंबात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर आता अश्विनी जगताप यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. आमच्या घरातील सगळी माणसे कामाला लागली आहेत. उद्या मी अर्ज दाखल करणार आहे. कुणाला काय करावे हे सांगायला लागत नाही. झोकून देऊन सगळे काम करत आहोत. सगळे रात्रभर जागून काम करत आहे. काय करायचे असे कुणी विचारत नाही. सगळ्यानी आपापली जबाबदारी स्वतःहून घेतली आहे. आम्ही सगळे जण एकत्र मिळून काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Published on: Feb 05, 2023 04:20 PM