Chandrakant Patil : वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा...; अमित शाहांची चंद्रकांत पाटलांसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना समज

Chandrakant Patil : वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा…; अमित शाहांची चंद्रकांत पाटलांसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना समज

| Updated on: Apr 12, 2023 | 10:49 AM

यावेळी शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा दम दिला आहे

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला होता. यानंतर त्यांच्यावर भाजपची केंद्रातील वरिष्ठ नेते आता नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्याचदरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर नाराज असल्याचे समोर येत आहे. यावेळी शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा दम दिला आहे. तर वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, अशी ताकीद अमित शाह यांची भाजप नेत्यांना दिली आहे.

Published on: Apr 12, 2023 10:49 AM