हवेतल्या गप्पा नकोत; राऊतांचा शाहांच्या तंबीवर निशाना
राऊत यांनी, शाह यांनी, मला माहित नाही, त्यांनी पाटलांना जाहीर खडसावलयं? त्यांना मंत्रीमंडळातून काढलय? असा सवालच केला. तर या हवेतल्या गप्पा नकोत आम्हाला
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला होता. यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा दम दिला. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. यावेळी राऊत यांनी, शाह यांनी, मला माहित नाही, त्यांनी पाटलांना जाहीर खडसावलयं? त्यांना मंत्रीमंडळातून काढलय? असा सवालच केला. तर या हवेतल्या गप्पा नकोत आम्हाला. आमची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे. जे स्वतःला शिवसैनिक वगैरे मानतात आणि तसा प्रचार करतात. आम्हीच खरे, आम्हीच खरे, हे जे काय असेल ना ते इलेक्शन कमिशनला जाऊन सांगा. ते पण मिंदेच आहेत असा घणाघात केला आहे.