सत्यजित तांबे जिंकतील असा मला विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
नाशिक पदवीधर निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होतेय. याचा आज निकाल आहे. या लढतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नाशिक पदवीधर निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होतेय. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर या मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी ही लढत होतेय. सत्यजित तांबे हे युवा नेते आहेत. या लढतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जिंकतीलच असं मला वाटतं. आजचा निकाल सरकारच्या बाजूने लागत आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचाही विजय झालाय. त्यामुळे सत्यजित यांनाही जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही, असं बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 03:26 PM
Latest Videos