Sanjay Kelkar | कल्याण-पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, जास्तीत जास्त जागा खिश्यात घेण्याचे मिशन?

Sanjay Kelkar | कल्याण-पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, जास्तीत जास्त जागा खिश्यात घेण्याचे मिशन?

| Updated on: Sep 07, 2022 | 3:30 PM

Sanjay Kelkar | कल्याण-पालघर लोकसभा मतदार संघासाठी भाजप मोर्चे बांधणी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता त्यावरुन शिंदे गट आणि त्यांच्यात ताणाताणी होते का, हे लवकरच स्पष्ट होईल.

Sanjay Kelkar | कल्याण-पालघर लोकसभा (Kalyan-PalGhar Lok Sabha) मतदार संघासाठी भाजप (BJP) मोर्चे बांधणी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता त्यावरुन शिंदे गट आणि त्यांच्यात ताणाताणी होते का, हे लवकरच स्पष्ट होईल. भाजप आमदार संजय केळकर (MLA Sanjay Kelkar) यांनी केंद्रीय कार्यकारणीचे वरिष्ठ नेते कल्याण-डोंबिवली, पालघर, ग्रामीण भागाचा दौरा करणार असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा हा दौरा आहे. 11,12,13 असा हा दौरा राहणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघा अंतर्गत आणि जवळपासचा डोंबिवली, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, उल्हासनगर या पाच मतदारसंघाचा दौरा ते करणार आहेत. ज्याठिकाणी भाजप नाही, अशा 16 ठिकाणी केंद्रीय मंत्री दौरा करून पक्ष बांधणी मजबूत करणार आहेत. त्यात कल्याण मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून कल्याण मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा रंगली आहे.

Published on: Sep 07, 2022 03:30 PM