Nana Patole : अमरावतीत झालेल्या काँग्रेस-भाजप युतीवर प्रदेशाध्यक्ष नाखूश; काय होणार युतीचं?
अमरावतीत भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या तत्वांना तिलांजली दिल्याचे समेर आल्याने अनेकांनी तोंडात बोंट घालती आहेत. अमरावतीच्या वरुड बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे
नागपूर : देशात आणि राज्यात भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. अनेकदा भाजपकडून काँग्रेसमुक्त भारतचे नारे देण्यात आले आहेत. तर भाजप पासून देश आणि संविधान वाचवण्याचा नारा काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिला आहे. मात्र अमरावतीत भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या तत्वांना तिलांजली दिल्याचे समेर आल्याने अनेकांनी तोंडात बोंट घालती आहेत. अमरावतीच्या वरुड बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. यात भाजप खासदार अनिल बोंडे सक्रिय होते. त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्याला आणि काँग्रेस पक्षाला हे मान्य नसून याबाबत काळजी घेतली जाईल. तसेच या युतीसाठी पक्षातील ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे वरुड बाजार समितीतील काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.