BJP Tweet : … ही ‘ढोंगी’ वृत्ती, तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यांचेच नेते, भाजपचा शरद पवार यांच्यावर घणाघात
VIDEO | भाजपकडून ट्वीट करत शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला इतकेच नाहीतर शरद पवार अजूनही साडेतीन जिल्ह्यांचेच नेते असल्याचे म्हणत भाजपने शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | भाजपकडून ट्वीट करत शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला इतकेच नाहीतर शरद पवार अजूनही साडेतीन जिल्ह्यांचेच नेते असल्याचे म्हणत भाजपने शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ‘अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं’, असे म्हणत पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. तर भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्विकारले नाही. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास असल्याचेही या ट्वीटमध्ये म्हटले आहे.