भाजप पदाधिकाऱ्यांचा पोलीस अधिकारी शेखर बागडेंवर गंभीर आरोप; नंदू जोशी विनयभंग प्रकरण भोवलं का?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी कोट्यवधीची मालमत्ता जमवल्याचा आरोप करत या संदर्भात ईडी व सीबीआयकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे यांनी पत्रकार परिषदे घेऊन दिली आहे.
डोंबिवली: भाजपचे मंडळ अधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाने मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट पोलीस अधिकाऱ्याची बदली व्हावी यासाठी आंदोलन करत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करायचं नाही असा ठराव केला, मात्र या वादावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडदा टाकल्यानंतर आता सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मनमिळावा झाला असला, तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी कोट्यवधीची मालमत्ता जमवल्याचा आरोप करत या संदर्भात ईडी व सीबीआयकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे यांनी पत्रकार परिषदे घेऊन दिली आहे.
Published on: Jun 12, 2023 02:33 PM
Latest Videos