‘…इशारा काफी होता है’; सत्तेत राष्ट्रवादी सामिल झाल्याने भाजपमध्ये खदखद? भाजप आमदाराचे सूचक वक्तव्य
भाजपसह शिंदे गटात यामुळे नाराजी आहे. अशीच नाराजी सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खाते वाटपावरून दिसून आली आहे. तर कोल्हापूरमध्ये भाजप ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नाराजी बोलून दाखवत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती.
सातारा : राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस वाटेकरी झाल्याने त्याचा अनेकांना धक्का बसला आहे. तर भाजपसह शिंदे गटात यामुळे नाराजी आहे. अशीच नाराजी सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खाते वाटपावरून दिसून आली आहे. तर कोल्हापूरमध्ये भाजप ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नाराजी बोलून दाखवत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर आता ही नाराजी साताऱ्यात पाहायला मिळत आहे. येथे भाजप सातारा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने टिफीन बैठकीचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय बैठक मारून सर्वांनी एकत्र जेवण केले. या झालेल्या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांनी सूचक वक्तव्य केले. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी गोरे यांनी या सरकारचा हाय कमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. भाजपला कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे चांगलंच समजतं. त्यामुळे समजणे वालों को इशारा काफी होता है, असे सूचक विधान गोरे यांनी केले आहे. आमदार गोरे यांनी केलेलं हे विधान नक्की कोणासाठी होतं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. तर गोरेंचा निशाना जिल्ह्यातील अजित पवार गटाकडे तर नव्हता ना अशा सुद्धा चर्चांना उत आला आहे.