भाजपच्या 'या' माजी नगरसेवकाला बंटी-बबलीने लावला 22 लाखांचा चुना!

भाजपच्या ‘या’ माजी नगरसेवकाला बंटी-बबलीने लावला 22 लाखांचा चुना!

| Updated on: Aug 01, 2023 | 10:38 AM

डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकाला बंटी बबलीने 22 लाखांचा चुना लावला.रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

ठाणे : डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश माने यांना उल्हासनगरमधील बंटी-बबलीने 22 लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. एका कामानिमित्त त्यांची ओळख उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या हितेश साधुराम पंजाबी ,पूजा हितेश पंजाबी नावाच्या बंटी बबलीसोबत झाली. या दाम्पत्याने, 2019 ते मे 2023 या कालावधीत आम्ही जिन्स कारखान्यामध्ये काही पैसे गुंतवणूक करत आहोत.या गुंतवणुकीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक 35 दिवसांनी 50 हजार रुपये परतावा मिळेल असे सांगितले.या बंटी बबलीच्या गुंतवणूक योजनेवर आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश यांनी या योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. माने यांनी या योजनेत रोख स्वरुपात एकूण २२ लाख रुपये गुंतविले. गुंतवणुकीनंतर माने यांना दर महिन्याला ठराविक परतावा मिळणे अपेक्षित होता.पंजाबी दाम्पत्याने वेळोवेळी खोटी कारणे देऊन आकर्षक व्याज देण्यास माने यांना टाळाटाळ सुरू केली. मागील तीन वर्षापासून हा प्रकार सुरू होता.आकर्षक व्याज मिळत नसल्याने माने यांनी मुद्दल रक्कम परत करण्यासाठी पंजाबी दाम्पत्याकडे तगादा लावला. ती रक्कम परत करण्यास दाम्पत्य टाळाटाळ करू लागले. व्याजाबरोबर मूळ रक्कम परत मिळत नसल्याने आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रकाश माने यांनी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. माने हे 1985 साली भाजप नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले होते. मात्र आता शिंदे गटात प्रवेश केल्याने ते शिंदे समर्थक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

Published on: May 16, 2023 08:56 AM