सोमय्या यांचा सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल विरोधात तक्रार; काय आहे प्रकरण?
सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा कोविड सेंटर्सकडे वळवला आहे. त्याचसंदर्भात त्यांनी पुढचे पाऊल टाकत संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
मुंबई : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांना तुरूंगात जाव लागलं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांची नावं या यादित आहेत. तर आता अनिल परब, हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. आता सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा कोविड सेंटर्सकडे वळवला आहे. त्याचसंदर्भात त्यांनी पुढचे पाऊल टाकत संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस आणि अन्य भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट हे फसवणूक करून मिळवल्याचा अरोप त्यांनी केला आहे. तर या सेंटरमध्ये 3 कोवीड रुग्णाचे मृत्यू झाला होता.