खिल्ली उडवणाऱ्या निलेश राणे यांना राष्ट्रवादी नेत्याचा पुन्हा इशारा; ‘पुन्हा बोलाल तर नक्कीच झोप उडवू’

खिल्ली उडवणाऱ्या निलेश राणे यांना राष्ट्रवादी नेत्याचा पुन्हा इशारा; ‘पुन्हा बोलाल तर नक्कीच झोप उडवू’

| Updated on: Jun 10, 2023 | 2:34 PM

“निवडणूक जवळ आली की, पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” असं टि्वट निलेश राणेंनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता होता.

कोल्हापूर : माजी खासदार, भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. “निवडणूक जवळ आली की, पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” असं टि्वट निलेश राणेंनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता होता. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छोट्या राणेंनी लायकीत रहावं,नाहीतर आम्हाला उत्तर द्यावं लागेल असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना मला झोप लागली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली उडवली होती. त्यावरून आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा निलेश राणे यांचा समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी, पद मिळेल या अपेक्षा ठेऊन असं बोलतात, त्यांना ते मिळेल ही. पण वेगळ्या पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची पक्ष बदलले की भूमिका बदलायची अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही जाऊन बोलायचं त्यांना असं वाटत असेल आम्ही त्यांना घाबरतो तर त्यांना म्हणावं तुम्ही स्वप्नातच राहा. पण जर पुन्हा अस वक्तव्य कराल तर तुम्हाला झोप लागणार नाही याच्या बंदोबस्त आम्ही करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Published on: Jun 10, 2023 02:34 PM