बापट गेल्याचे हे दु:ख न सहन होण्यासारखे : चंद्रशेखर बावनकुळे

बापट गेल्याचे हे दु:ख न सहन होण्यासारखे : चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Mar 29, 2023 | 2:52 PM

भारतीय जनता पक्षात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, संस्कारी क्षेत्रामध्ये काम करणारा एक मोठं नेतृत्व आपल्यामधून निघून गेल्याचे बावनकुळे म्हणाले.

नागपूर : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आप आपल्या प्रतिक्रिया देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही श्रद्धांजली वाहताना, बापट गेल्याचे हे दु:ख न सहन होण्यासारखे असल्याचे म्हटलं आहे. तर भारतीय जनता पक्षात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, संस्कारी क्षेत्रामध्ये काम करणारा एक मोठं नेतृत्व आपल्यामधून निघून गेल्याचेही ते म्हणाले. तर आज पक्ष या ठिकाणी, या उंचीवर आहे यामध्ये स्वर्गीय बापट साहेबांचा संपूर्ण खूप मोठा वाटा असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

 

Published on: Mar 29, 2023 02:52 PM