Raosaheb Danve | दुसरा पक्ष फोडण्यात भाजपचा इंटरेस्ट नाही, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खुलासा
Raosaheb Danve | दुसरा पक्ष फोडण्यात भाजपचा इंटरेस्ट नाही, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.
Raosaheb Danve | दुसरा पक्ष फोडण्यात भाजपचा (BJP) इंटरेस्ट नाही, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी याविषयीचा खुलासा केला आहे. भारतीय जनता पार्टी कधीच कोणता पक्ष फोडत नाही. पण एखाद्या पक्षात फूट पडत असेल आणि ते सोबत यायला तयार असतील तर भाजप मदतीचा हात पुढे करेल असा संकेत ही त्यांनी दिले. अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस (Chavan-Fadnavis)यांच्या भेटीवर भाष्य करताना, जेवढे असंतुष्ट आहे. त्यांची सध्या भाजपला गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी गरज असेल आणि असंतुष्ट लोक येत असतील तर भाजप त्यांचा उपयोग करुन घेईल, असे इरसाल वक्तव्य ही त्यांनी केले. जर भाजपला गरज असेल तरच असंतुष्टांना मदत करण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात सध्या नसला तरी आगामी काळात भूकंप होण्याचे स्पष्ट संकेत मिळतात.