tv9 Special Report | नेमाडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वादाची ठिणगी; भाजपचा पलटवार
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या एका वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे. नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभात औरंगजेबच्या काळातील इतिहास उकरला.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राज्यात काही दिवसापासून शांत असणारा आता वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज्यात वादाचे आणि दंगलींचे कारण औरंगजेब ठरला होता. त्यानंतर आता यावर राज्यात शांत वातावरण झाले असतानाच पुन्हा एकदा हा वाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या एका वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे. नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभात औरंगजेबच्या काळातील इतिहास उकरला. त्यावेळी तेथे शरद पवार आणि अशोक वाजपेयी उपस्थित होते. या कार्यक्रमात नेमाडे यांनी, “औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा तो पहिला होता. तर औंरगजेबाचा दोन राण्या होत्या. त्यांना पंडितांनी काशीविश्वेश्वरात भ्रष्ट केल्या. यावरूनच औरंगजेबाने तेथे मोडतोड केली. जी आज ज्ञानव्यापी म्हणून आता ओळखली जाते असाही दावा केला. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. तर यावरून भाजपकडून अक्षेप घेण्यात आला आहे. पाहा यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया…