Ajit Pawar on Resign : माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला?
अजित पवार यांनी, आज जे रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत. माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांना हा अधिकार कोणी दिला. मला विरोधी पक्ष नेता हे भाजपने नाही तर माझ्या पक्षाच्या आमदारांनी केलं आहे, असे ते म्हणाले.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांवरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तसेच त्यांनी यावेळी आपल्या वक्तव्यावर ठाम भूमिका घेत आपण काही चुकीचे बोललं नसल्याचेही सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत यांना कोणी अधिकार दिला असा सवालच केला.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असे वक्तव्य सभागृहात अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर भाजपने रान उठवत त्याच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आज अजित पवार यांनी जोरदार टीका केली.
यावेळी अजित पवार यांनी, आज जे रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत. माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांना हा अधिकार कोणी दिला. मला विरोधी पक्ष नेता हे भाजपने नाही तर माझ्या पक्षाच्या आमदारांनी केलं आहे, असे ते म्हणाले.