Assembly Election Result 2024 : …अन् जोरदार मुसंडी, भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व यशाचं क्रेडिट फक्त देवेंद्र फडणवीसांना कारण…
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवावर मात करून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा यासह महायुतीने २०० पारचा नारा दिला होता. याचाच थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, भाजप आणि महायुतीच्या अभूतपूर्व यशाचं क्रेडिट फक्त देवेंद्र फडणवीसांना जात असल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघात मायक्रो प्लानिंग केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समीकरणानुसार त्यांनी रणनिती आखली. उमेदवार निवडीपासून ते विजयी करण्यासाठी पूर्ण रसद पुरवली. निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा मास्टरस्ट्रोक दिला. यादरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा खुबीनं हाताळला. मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणं टाळून जरांगे फॅक्टर नाहीसा केला. ऐनवेळी शेतकरी कर्जमाफीचा वायदा केल्यानं नाराज शेतकरीही महायुतीकडे वळले. एक है तो सेफ है.. म्हणत हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यात ते यशस्वी झाले.