Dipali Sayyed on BJP : भाजपचे ते दोन वाचाळवीर कोण? शिवसेनेवर कोण करतंय टीका? काय म्हणाल्या दिपाली सय्यद
Dipali Sayyed statement: भाजप हा आमचा शत्रू पक्ष नसल्याचे विधान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केले आहे.
भाजपा आमची शत्रू नाही असे मोठं विधान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी केलं आहे. भाजपाविरुद्ध (Against BJP) बोलण्यास कुठलाही आनंद होत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात काय होईल ते माहिती नाही. पण भाजपाने वस्तूस्थिती समजून घ्यावी असे सूचक विधान ही त्यांनी केले. मुख्यमंत्री विराजमान झालेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमच्यासाठी काल, आज आणि उद्याही आदरणीयच असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचं त्यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे शिवसेनेचा रोख कोणत्या दिशेने आहे हे दिसून येते. भाजपशी शत्रुत्व नसल्याचे सांगत सय्यद या काय भाष्य करु इच्छित आहेत याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.
किरीट सोमय्या यांच्यासह इतर दोन भाजप नेते हे वाचाळवीर असल्याची खोचक टीका ही त्यांनी केली. ते सतत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असतात. आमच्यातील शिवसेना (Shivsena) आजही जीवंत असल्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे. ट्विट करुन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे.