Supriya Sule | कदाचित भाजपच ‘ईडी’ चालवत असेल

Supriya Sule | कदाचित भाजपच ‘ईडी’ चालवत असेल

| Updated on: Feb 23, 2022 | 11:22 AM

समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी(Nawab Malik) अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली.  यामुळेही त्यांना ईडीची (ED) नोटीस आली ही शक्यता नाकारता येत नाही.

पुणे – समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी(Nawab Malik) अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली.  यामुळेही त्यांना ईडीची (ED) नोटीस आली ही शक्यता नाकारता येत नाही. नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. त्यामुळेही झालं असेल. कारण सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याच आश्चर्य वाटत नाहीत. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. भाजपचे आणि ईडीचे अध्यक्ष एक असतील. किंवा भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल. असे असू शकते. माझा ईडीचा काही अभ्यास नाही.  जाणीवपूर्वक  ठरवून या गोष्टी केल्या जात असल्याचे मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. ट्विटर या माध्यमाचा खूप चांगला उपयोग भाजपचे लोकं या धमक्यांसाठी करत आहेत. हे निदर्शनास आले आहे.अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya  Sule) यांनी केली आहे.

Published on: Feb 23, 2022 11:22 AM