Special Report | मुख्यमंत्रीपद…जात आणि वाद
महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. 2019 मध्ये कुणाचा मुख्यमंत्री व्हावा यावरुन वाद झाला होता. नगरसेवक, महापौरच का तर पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. 2019 मध्ये कुणाचा मुख्यमंत्री व्हावा यावरुन वाद झाला होता. नगरसेवक, महापौरच का तर पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 145 चं बहुमत आणा आणि कुणीही मुख्यमंत्री व्हा, त्यासाठी एका जाती, धर्माचाच नाही तर तृतीयपंथीही मुख्यमंत्री होऊ शकतो असंही अजित पवार यांनी सांगितले. आता हा वाद मराठा, बिगरमराठा ब्राह्मण आणि मुख्यमंत्री असा उफाळून आला आहे. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाबाबतचा हा वाद काही नवा नाही तो वाद अगदी 1960 पासून सुरु आहे. 1960 मध्ये मुख्यमंत्री मराठा राहिल की मराठी या वादाला यशवंतरावांनी उत्तर देताना सांगितले की, राज्य जातीने नाही तर मराठीने पुढे जाईल असं यशवंतराव चव्हाणांनी सांगितले होते.