अण्णा हजारे यांच्याप्रमाणेच मनोज जरांगे पाटील यांचाही… भाजप नेते आशिष देशमुख यांचा निशाणा कुणावर?
अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनचा फायदा घेतला. तसा तुमच्या आंदोलनचा कुणी फायदा करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थोडे धीर धरून वक्तव्य करावं असा सल्ला भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिलाय.
वाशिम : 12 ऑक्टोबर 2023 | मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष नाही. पण विरोधी पक्ष तसा जाणीवपूर्वक प्रयत्न करताहेत. राज्यामध्ये सामाजिक सलोखा राहणे गरजेचे आहे. राज्य सरकार ही सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. विरोधकांनीसुद्धा सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन भाजप नेते आशिष देशमुख यांनी केले. ओबीसी यांचा टक्का कमी न होता मराठा आरक्षण मिळावे यावर सर्वच पक्ष ठाम आहेत. सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी थोडे धीर धरून वक्तव्य करावं, असे देशमुख म्हणाले. जरांगे पाटील प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा घेतला. त्याचप्रमाणे शरद पवार हे सुद्धा आपला संपलेला पक्ष वाचवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम शरद पवार करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.