सदा सरवणकरांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी, अमित ठाकरेंसोबत भाजप?

| Updated on: Nov 08, 2024 | 1:34 PM

यंदा माहिम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे, ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी भाजपची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने पेच निर्माण झालाय.

Follow us on

सदा सरवणकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे काल गुरूवारी उद्धाटन झाले. या कार्यक्रमाला वृषाली श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित राहणार असे पोस्टर झळकवण्यात आले होते. सरवणकरांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन वृषाली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यक्रमाला आशिष शेलार यांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर सदा सरवणकर यांना सवाल केला असता ते म्हणाले, आमचा कार्यक्रम हा बुधवारी सकाळी निश्चित केला, आशिष शेलारांना फोन केला तेव्हा त्यांनी वेळ बघून मी निश्चित येण्याचा प्रयत्न करतो. सकाळी मला त्यांचा फोन आला, वेळेचं जमत नाही. तेदेखील एक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांची अडचण करण्याची भावना नव्हती. महायुतीचे उमेदवार म्हणून ते आमच्या पाठीशी आहेत. ते आमचे ४० वर्षांची मैत्री आहे. वैयक्तिक संबंध हे आमचेही राजसाहेबांसोबत आहेत. राजसाहेब आपल्यातले एक आहेत, अशी भावना होती. पण ही लढाई आहे. महायुतीचे कार्यकर्ते या मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण विधानसभेत पाठवतील असा विश्वास यावेळी सरवणकरांनी व्यक्त केला.