‘उबाठाने नाणारला विरोध करुन पाकला मदत केली?’, भाजपच्या बड्या नेत्याची आगपाखड

| Updated on: Jul 29, 2023 | 3:07 PM

VIDEO | 'आपल्याकडील विरोधामुळे नाणार पाकमध्ये गेला', भाजपच्या बड्या नेत्यानं नेमके काय केले उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप?

मुंबई, २९ जुलै २०२३ | राज्यातील राजकीय वातावरण कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून चांगलंच तापलेलं असताना आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. अशातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. भारतातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. तर उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाला विरोध करून सरळ पाकिस्तानला मदत केली का? असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल केला आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?, असाही प्रश्न विचारला आहे.

Published on: Jul 29, 2023 02:57 PM
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक आक्रमक; केसरकर म्हणतात, ‘भिडे आणि भाजपचा संबंध’
भाजपसह शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका; म्हणाले, आठवड्याला असाच एक एक नेता फोडा’