आमदार निलंबन प्रकरण : आमचा न्यायालयावर विश्वास; न्याय नक्की मिळणार – शेलार

| Updated on: Jan 11, 2022 | 10:50 PM

सुप्रीम कोर्टात आज नेमके काय झाले?  याबाबत भाजपा नेते अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बारा आमदार निलंबन प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या 12 निलंबित (Suspension of 12 BJP MLAsआमदारांना सुप्रीम कोर्टाकडून लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टात आज नेमके काय झाले?  याबाबत भाजपा नेते अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बारा आमदार निलंबन प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय नक्कीच मिळेल असे अशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Special Report | दुसऱ्या लाटेत बेड मिळत नव्हते, यावेळी बेड रिकामे ?
ITR Filing : आयटीआर रिटर्नसाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ