Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन

कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन

| Updated on: Apr 09, 2022 | 12:41 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाचे (msrtc protest) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी समर्थन केलं आहे. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी पवारांवर खोचक टीकाही केली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाचे (msrtc protest) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी समर्थन केलं आहे. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी पवारांवर खोचक टीकाही केली आहे. कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशी खोचक टीका करत उदयनराजे भोसले यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं. घराणेशाही संपली पाहिजे. लोकशाही टिकली पाहिजे. राज्यामध्ये सध्या घराणेशाही चालू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना घराणेशाहीसाठी पक्ष चालवत आहेत. मुलगा, मुलगी, नातू पक्षामध्ये आमदार-खासदार होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलही भिरकावली होती. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. मात्र काही नेत्यांनी या हल्ल्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यात आता उदयनराजे यांनीही या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.