चित्रा वाघ याचं सुचक वक्तव्य; ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार? भाजप महिला आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागणार?’

चित्रा वाघ याचं सुचक वक्तव्य; ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार? भाजप महिला आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागणार?’

| Updated on: Jul 26, 2023 | 8:11 AM

या विस्तारात अजित पवार गटाने सत्तेत प्रवेश केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासह ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांचं मंत्रीपद हुकलं आहे.

मुंबई | 26 जुलै 2023 : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता याच महिन्यात दुसरे मंत्रि मंडळविस्तार पार पडला आहे. या विस्तारात अजित पवार गटाने सत्तेत प्रवेश केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासह ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांचं मंत्रीपद हुकलं आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी कधी लागणार असा सवाल आता केला जात आहे. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला आमदार मंत्री नसल्याने टीका होत होती. मात्र अजित पवार गटातील आदिती तटकरे यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आणि एक महिला आमदाराची वर्णी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये लागली. यानंतर आता आणखीन महिला आमदारांचा तर भाजप महिला आमदारांच्या मंत्रीपदावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचमुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोंडी फोडली आहे. त्यांनी सुचक वक्तव्य करताना, विधान परिषद आणि विधानसभेत सगळ्यात जास्त या महिला आमदार भाजपच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदार मंत्री झालेल्या दिसतील असं वक्तव्य केलं आहे.

Published on: Jul 26, 2023 08:11 AM